सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परबांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांची अटकपुर्व जामीन याचिका फेटाळली होती.पण याचवेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना दिलासा ही दिला आहे.कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.निदान तोपर्यंत तरी नितेश राणेंना अटक करता येणार नाही.शरण आल्यानंतरही नितेश राणे जामिनासाठी अर्ज करु शकतात.
शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी विधानसभेत संतोष परब यांच्यावर हल्ल्याप्रकरणी प्रस्ताव मांडला होता. कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.त्यानंतर नितेश राणे काही दिवसांसाठी अज्ञात स्थळी गेले.पण नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी कोर्टात उपस्थित होते. नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं असल्याचा दावा यावेळी मुकुल रोहतगी यांनी केला. ज्यांची नावं आहेत त्यांच्याशी संपर्क झाल्याचा कोणताही पुरावा नसून, आदित्य ठाकरेंना डिवचल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.
त्यातचं शिवसेनेचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातुन 'लघु सुक्ष्म दिलासा' अशी खोडसाळ पणे टिका करत नितेश राणे यांना लक्ष केलं आहे.अशातचं हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता वाटत आहे.