राजन साळवी यांना सर्व शिवसेना आमदारांनी मतदान करण्याचा सुनील प्रभू यांचा पक्षादेश .

३ आणि ४ जुलैला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे . अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेचे राजन साळवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.;

Update: 2022-07-02 13:06 GMT



उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानन्तर शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीने आता सत्ता स्थापन करण्यात येणार आहे . एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis )यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली .याच पार्श्वभूमीवर ३ आणि ४ जुलैला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे . अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजप ने आपल्या पक्षाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीने शिवसेनेचे राजन साळवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.




 


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढले आहे. आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी निवड केली आहे. यानिवडीला एकनाथ शिंदे यांच्या गटाने थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. ११ जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. पण त्याआधी होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आदेश काढला आहे.

''महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. रविवार दिनांक ३ जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेनेतर्फे राजन साळवी यांना नामनिर्देशीत करण्यात आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यांनी संपूर्ण वेळ विधानसभा सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनी मतदान करावे असा पक्षादेश आहे.'' अशा आशयाचे पत्र सुनील प्रभू यांनी काढले आहे.

Tags:    

Similar News