बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांबाबत केलेले विधान धक्कादायक: किशोर मांध्यान, आप
विधानसभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गाजला होता. यात आमदार बचू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना असाममध्ये खूप मागणी आहे. राजयातले भटके कुत्रे असाम ला पाठवून त्याचा व्यापार करता येईल असं म्हटलं होत. यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे.;
विधानसभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गाजला होता. यात आमदार बचू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना असाममध्ये खूप मागणी आहे. राजयातले भटके कुत्रे असाम ला पाठवून त्याचा व्यापार करता येईल असं म्हटलं होत. यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे. राज्यातील भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवण्याची सूचना विधानसभेत कडू यांनी चर्चे दरम्यान केली आहे. ही त्यांची सूचना धक्कादायक आणि अनेक प्राणीमित्रांना वेदना देणारी आहे अशी प्रतिक्रिया आप चे राज्य उपाध्यक्ष किशो (Kishore Madhyan)र मंध्यान यांनी दिली आहे. प्राणी हक्क आणि संरक्षण बाबतच्या आणि अनेक कोर्ट निकालानुसार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणे आवश्यक आहे. परंतु भटकी कुत्री इतर राज्यात पाठवणे व त्यांची हत्या करणे अमानवी ठरेल. आसाम हे कुत्री सोडण्याचे डम्पिंग ग्राउंड करणे योग्य ठरणार नाही. कुत्र्यांच्या हल्ला झालातर योग्य उपचार मिळावेत यासाठी पुरेश्या सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करणे जरुरी आहे तसेच भटक्या कुत्र्यांसाठी निवारा आणि निगराणी आवश्यक आहे. या बाबत संघटना , संस्थांशी संवाद साधत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपाययोजना चा अभ्यास करून घोरण निर्णय आम्हाला अपेक्षीत आहे असे किशोर मांध्यान यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते बच्चू कडू ?
बच्चू कडू म्हणाले की, यासाठी समिती स्थापन करण्याऐवजी कृती आराखडा तयार करून तो आराखडा काही शहरांमध्ये प्रायोगिकपणे करून पाहिला पाहिजे आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करून इतर शहरांमध्येही त्याची अंमलबजावणी करावी. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना उचला आणि आसामला पाठवा. आसाममध्ये कुत्र्यांची किंमत आहे. तेथे आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. गुवाहाटीला गेल्यावर कळाले. इथे ज्या प्रकारे बकऱ्याचे मांस खाल्ले जाते, त्याच पद्धतीने कुत्र्याचे मांस खाल्लेले असते. हैद्राबादमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या चार वर्षांच्या चिमुरड्यावर कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला चढवला. त्यांनी मुलाचे अक्षरश: लचके तोडले. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. 2030 पर्यंत रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना आखण्यात आली आहे. दिल्ली, बंगळुरू, मेरठ, गुरुग्राम, पंजाब, नोएडा, मुंबई, पुणे, बिजनौर अशा अनेक शहरांमधून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या येत अहेत. भारतात दरवर्षी सुमारे दोन कोटी लोकांना प्राणी चावतात. यातल्या 92 टक्के घटना तर कुत्र्यांनी चावा घेण्याच्या आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगात रेबीजने मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी 36 टक्के मृत्यू हे भारतात होतात. म्हणजेच दरवर्षी 18,000 ते 20,000 लोक रेबीजमुळे मरतात. भारतात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 30 ते 60 टक्के मृत्यू हे 15 वर्षांखालील मुलांचे असतात. लसीच्या मदतीने रेबीजपासून होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो. ही लस सर्वत्र उपलब्ध आहे.