राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत भुमिका घेतली आहे. त्यातच राज ठाकरे यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्य सरकारने राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच वाढवले आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भुमिकेनंतर केंद्र सरकारने राज ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. तर त्यानंतर राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा जाहीर केला आहे. तर या दौऱ्याला उत्तर भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. त्यातच राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांना भेटून सांगितले होते. तसेच राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी संपुर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अजानबाबत जे सुरू आहे ते बंद करा. अन्यथा तुम्हाला ठार करू. तसंच तुम्हाला तर सोडणार नाहीच. पण राज ठाकरे यांनाही मारून टाकू, अशा आशयाचे उर्दू भाषेतील पत्र मिळाले. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना ते पत्र दाखवून त्यानंतर पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर संपुर्ण महाराष्ट्र पेटेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा विचार करून राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्था कशी असणार?
राज ठाकरे यांना केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. ती केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची दिलेली सुरक्षा कायम ठेवली आहे. तर राज्य सरकारने राज ठाकरे यांना अतिरीक्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे.