"राजपूत आणि ब्राह्मण चोर आहेत, त्यांची मतं नकोत" आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Update: 2021-09-30 11:31 GMT

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधील इसौलीचे आमदार अबरार अहमद यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात ते राजपूत आणि ब्राह्मण जातींविरोधात आपत्तीजनक शब्दाचा वापर केला आहे.

सपा आमदार अबरार अहमद यांनी पत्रकारांशी केलेल्या संभाषणादरम्यान हे विधान केलं आहे, मात्र, विधानानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अबरार अहमद व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणतात, "राजपूत आणि ब्राह्मण हे छोटे आहेत, त्यांच्या मतांची गरज नाही. राजपूत आणि ब्राह्मणाशिवाय निवडणूक जिंकली जाऊ शकते."

ते पुढे म्हणतात - आमचे खरे मतदार मुस्लिम आहेत. मात्र, त्यांचं हे विधान आगामी विधानसभा निवडणुका 2022 च्या निवडणुकांच्या अगोदर आल्यानं समाजवादी पार्टी अधिकच अडचणीत सापडली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येक पक्ष ब्राह्मण कार्ड खेळत असताना सपा च्या एका आमदाराने हे विधान केल्यानं पक्ष आणखी अडचणीत आला आहे. प्रत्येक पक्ष ब्राह्मण समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. बसपा, सपा आणि भाजप सध्या ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न करताना दिसत आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्यासाठी एक प्रबुद्ध ब्राह्मण परिषद आयोजित करण्याचं नियोजन केलं आहे. त्यांनी लखनौमध्ये भगवान पशुरामांची सर्वात उंच मूर्ती बसवण्याचे आश्वासन देखील ब्राहमण समाजाला दिले आहे.

मात्र, अबरार अहमद यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजपूत आणि ब्राह्मणांच्या सर्व संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप नेते ओम प्रकाश यांनीही अबरार अहमद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आमदार अबरार अहमद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर राज्यातील पक्षांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे.

मात्र, सपा आमदाराचं हे वक्तव्य भाजपच्या हातात आयतं कोलित दिलं सारखं आहे. त्यामुळं आगामी निवडणुकात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.दरम्यान, अबरार अहमद यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री अनिल राजभर यांनी "हे वक्तव्य सपाची मानसिकता दर्शवतं, सपा नेहमीच समाज तोडण्याचं काम करते हे आमदाराच्या या विधानावरून हे स्पष्ट होतं."

असं म्हणत सपा वर निशाणा साधला आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे अबरार अहमद... मात्र, ही अबरार अहमद यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी भाजपच्या जिल्हा पंचायत अध्यक्ष उषा सिंह यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. त्यादरम्यान, लोकांनी विधानसभेसमोर त्याचा पुतळा देखील जाळला होता. याशिवाय त्यांनी सपा सुप्रीमो मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात देखील वादग्रस्त विधाने केली आहेत.

दरम्यान, अबरार खान हे आझम खानचे सर्वात जवळचे मानले जातात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, अबरार अहमद यांनी निवडणूक आयोगाला धमकी दिली होती की, जर आझम खान यांच्यावरील बंदी उठवली नाही तर ते उपोषण करतील. मात्र, सध्या राजपूत आणि ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य करून त्यांनी सपाच्या अडचणी वाढवल्या आहेत.

भाजपचे राज्यमंत्री संजय राज यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

यासोबतच, उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष संतोष सिंह यांनी ट्विट केलं आहे.

Tags:    

Similar News