सध्या राजकारणात सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात राजकीय चढाओढ सुरु आहे.रोज आरोप-प्रत्यारोपांच्या वाद रंगत आहे.याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Cm uddhav thackrey) हे १४ मे रोजी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेणार आहेत.या सभेच्या आधी शनिवारी ३० एप्रिलला राज्यातील ३० एप्रिलला राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील सोमय्या मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम होणार असून भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरुन(BJP) भाजप-मनसेकडून वातावरण तापवले जात आहे.त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचे आरोपसत्र सुरुच असून भाजपसमर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान दिल्याने वातावरण आणखी तापले.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्टच्या एका कार्यक्रमात आपण सभेद्वारे सर्व विरोधकांना उत्तर देणार असे सांगितले.त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी मुंबईत पोलखोल सभा घेण्याचे जाहीर केलें.तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे(Raj thackrey) हे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत.मे चा पहिला आठवडा हा जाहीर सभेंचा असणार आहे.तसेच राजकीय वारा कोणाच्या दिशेने फिरणार हे पाहनं महत्वाचं ठरणार आहे.