शिवसेना Vs शिवसेना : मदतच करायची तर शंभर रुपये तरी कशाला घेता? अंबादास दानवे यांचा सवाल
दसरा मेळाव्यानिमीत्त शिवाजी पार्क आणि बीकेसीच्या सभेकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडले.;
दसरा मेळाव्यानिमीत्त दोन्ही शिवसेनेत खडाजंगी पहायला मिळाली. यावेळी राज्य सरकारने दिवाळीनिमीत्त साखर, तेल, डाळी आणि रवा यासारख्या वस्तू अवघ्या शंभर रुपयात देण्याचा निर्णय घेतला. यावरून अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
दसरा मेळाव्यानिमीत्त शिवाजी पार्क आणि बीकेसीच्या सभेकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडले.
यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, दिवाळीनिमीत्त सर्वसामान्यांना रवा, साखर, तेल, डाळ अशा गोष्टी रेशन दुकानातून 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र हा निर्णय घेण्याआधी सरकारने सोमवारी एक टेंडर निघालं. या नंतर राज्य सरकारने शंभर रुपयांमध्ये वस्तू देण्याचा निर्णय घेतला. परंतू सर्वसामान्य नागरिकांकडून शंभर रुपये घेण्यापेक्षा त्यांना या वस्तू मोफत द्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
अंबादास दानवे म्हणाले की, सर्वसामान्यांना मदतच करायची आहे. तर शंभर रुपये तरी कशाला घेता? त्यांना या वस्तू मोफत द्यायला हव्यात. तसेच या वस्तूसाठी टेंडर काढण्यापेक्षा तुम्ही नागरिकांच्या खात्यात थेट पैसे टाकून मदत करू शकला असता, असंही अंबादास दानवे म्हणाले.