संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून निलेश राणे यांचा उध्दव ठाकरे यांना खोचक टोला
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही खोचक टोला लगावत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.;
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही उध्दव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. त्यामध्ये निलेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांची तुलना सैराट मित्रमंडळाशी केली आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, उध्दव ठाकरे यांची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्रमंडळासोबतही युती करतील.
उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 26, 2022
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केली होती टीका
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2019 मध्ये संभाजी ब्रिगेडने 40 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी त्यांना ०.०६ टक्के इतकी मतं मिळाली. तर अशा पक्षासोबत शिवसेनेने युती केली आहे. त्यामुळे यावरून असं दिसून येत आहे की, उध्दव ठाकरे यांच्याशी कुणीही युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबत जे आहेत तेसुध्दा पळून जातील. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती करून काहीही साध्य होणार नाही. सध्याचा काळ त्यांच्यासाठी वाईट असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उध्दव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युतीनंतर केलं मोठं वक्तव्य
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले की, पुढील निवडणूका आम्ही सोबत लढवू शकतो. मात्र त्यावर प्रतिक्रीया देतांना संभाजी ब्रिगेड सोबतची युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? असा सवाल भाजपने केला आहे.