तुमच्या अंगणात दोन धतुरे उगवलेत, शिवसेनेचे नारायण राणे यांच्यावर टीकास्र
नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष कायम आहे. त्यातच नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.;
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे. त्यातच नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीच्या दारात आहे. बाकी कुठंही अशा प्रकारचा चाफा नाही. मी उध्दव ठाकरे यांना गेल्या 39 वर्षापासून ओळखतो. ते लहान असल्यापासून, त्यांना काहीच येत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी उध्व ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर देतांना म्हटले की, अहो नारायण राणे, मातोश्री मध्ये चाफा फुलेल की नाही याची चिंता तुम्ही करू नका, परंतु तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या.
अहो नारायण राणे, मातोश्री मध्ये चाफा फुलेल की नाही याची चिंता तुम्ही करू नका, परंतु तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या!
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) October 1, 2022
मनिषा कायंदे यांनी नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर देतांना निलेश राणे आणि नितेश राणे यांनाही टोला लगावला.