एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात आमदारांपाठोपाठ खासदारांनीही भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली आहे. त्यात ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या भावना गवळी यांनीही उध्दव ठाकरे यांच्याकडे भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ राहुल शेवाळे यांनीही उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार फुटण्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान शिवसेनेकडून लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांच्याजागी राजन विचारे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र यामागे नेमकं कारण काय आहे? हे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.