भाजपला मतदान करा, शिवसेनेच्या बंडखोर गटाचा व्हीप जारी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला आज विधानसभ अध्यक्ष पदाच्या निवडणूकीला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने व्हीप जारी केला आहे.;

Update: 2022-07-03 04:11 GMT

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सरकारला आज विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला सामोरे जावे लागणार आहे. तर यासाठी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी राजन साळवी या शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होत त्यांचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता बंडखोर गटाने आपला व्हीप जारी केला आहे. त्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या सुनिल प्रभू यांनी व्हीप जारी केल्यानंतर हा व्हीप आम्हाला लागू होणार नाही. कारण आमच्याकडे 39 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला सुनिल प्रभू यांनी जारी केलेला व्हीप लागू होत नाही, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर रात्री ताज प्रेसिडेंसी हॉटेल येथे झालेल्या बैठकीत बंडखोर गटाने भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट आमने सामने आले आहेत. त्यामुळे कुणाचा व्हीप लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये म्हटले आहे की, शिवसेना व भाजपचे राहुल नार्वेकर हे उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी मतदान करायचे आहे. त्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आदेश एकनाथ शिंदे आणि भारत गोगावले यांनी दिले आहेत.




उध्दव ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनीही व्हीप जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी राजन साळवी यांना मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. 


 



Tags:    

Similar News