"मोठा दगड" आणि... किरीट सोमय्या

शिवसेना विरुध्द किरीट सोमय्या वाद क्षमायला तयार नाही. सोमय्या यांनी आता एक दगड फेकणा-या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट केला असून शिवसेनेचा मला मारण्याचा प्रयत्न होता असा दावा केला आहे.

Update: 2022-02-07 06:56 GMT

 ५ फेब्रुवारीला किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी जात असताना सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या वेळी सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले त्यांच्या हाताला आणि कंबरेला मुका मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सेना आणि सोमय्या दरम्यान आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तो मला मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप सोमय्यांनी शिवसेनेवर केला आहे. तसेच हल्ला करणाऱ्या त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावे अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

पुण्यातील एका कोविड सेंटरमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि पालिकेत निवेदन देण्यासाठी सोमय्या पुणे महानगरपालिकेत गेले होते. यावेळी सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी सोमय्यांच्या गाडीच्या दिशेने काहीजणांनी दगडफेक केली आहे. सोमय्या यांनी एक दगड फेक करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शिवसेनेचा मला मारण्याचा प्रयत्न होता असं म्हटलं आहे.

शिवसेनेचा हेतू 5 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा होता. सोबतचा व्हिडिओ क्लिप पहा, "मोठा दगड" आणि… अशा आशयाचे ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

सोमय्यांची ८ शिवसैनिकांच्या अटकेची मागणी

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला यानंतर सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुका मार लागला असल्याची माहिती दिली आहे. सोमय्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. यानंतर त्यांनी पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News