भाजपला पाठींबा द्या, शिवसेना खासदाराचे उध्दव ठाकरे यांना पत्र

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती निवडणूकीत भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली आहे.

Update: 2022-07-06 03:07 GMT

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्याने ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रपती निवडणूकीत भाजपला पाठींबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.

राहुल शेवाळी यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केलेली आहे.

खासदार राहुल शेवाळे यांचे उध्दव ठाकरे यांना पत्र

आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन दिले.

आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कतृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हिच परंपरा कायम ठेवत आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.




 


Tags:    

Similar News