शिवसेना Vs शिवसेना : अरे गद्दार काय म्हणता आम्ही तुमची प्रॉपर्टी मागितली का?- भावना गवळी
शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांचे दोन दसरा मेळावे झाले. या मेळाव्यात कोण काय बोलणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यातच बीकेसी मैदानात झालेल्या मेळाव्यात भावना गवळी यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला.;
बुधवारी झालेला दसरा शिवसेनेच्या इतिहासात ऐतिहासिक ठरला. कधी नव्हे तो शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. बीकेसी मैदानात झालेल्या मेळाव्यात भावना गवळी यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला.
आपल्या भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी शहाजी बापू आज मला शांत शांत वाटले असं म्हणाल्या. त्यानंतर मातोश्रीवरून अपमानीत केल्यानंतर हा ज्वलंत उठाव झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्यावर संकट आलं तेव्हा कुणी साथ दिली नाही हे आमचं दुखः, अशा वेळी आम्हाला एकनाथ शिंदेंची साथ मिळाली. अरे काय गद्दार, आम्ही काय तुमची प्रॉपर्टी मागितली का? मावळा धारातीर्थी पडल्यानंतर राजाने राजगादीतून खाली उतरून लढाईत साथ दिली पाहिजे पण इथे तसं झालंच नाही असं वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केलं.