नॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांची 'Post' व्हायरल

Update: 2022-06-21 05:08 GMT

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरत नाही तोच आता सरकारवरच संकट कोसळले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याने राजकीय भूकंप झाला आहे. त्यातच आता विविध न्यूज चॅनेल्सने दिलेल्या वृत्तानुसार शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २० आमदार आहेत. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांसह थेट सुरतमध्ये असल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे हे दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेही सांगितले जाते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी तासाभरापूर्वी एक फेसबुक पोस्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी एका ओळीची सूचक पोस्ट टाकली आहे. "#योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग" असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

Full View

एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (C R patil) यांच्यात भेट झाल्याची चर्चा असल्याची माहिती सुरत येथील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपचे सी आर पाटील हे अमदाबाद येथे योग दिनानिमित्त ठरलेला दौरा रद्द करून पहाटेच सुरतला पोहोचले आहेत. सुरत हा भाजपचा गड असून मुळचे जळगाव जिल्ह्याचे असलेले सी आर पाटील यांची पूर्ण पकड सुरतवर आहे. यामुळेच शिवसेनेच्या नाराज नेत्यांसाठी सुरक्षित असलेल्या सुरतची एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी निवड केली असल्याचं बोललं जात आहे. शिंदे यांनी योग दिवसानिमित्त सूचक अशी फेसबुक पोस्ट ही टाकली आहे.यामुळे शिवसेनेच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.


Similar News