उध्दवजी कुटूंब सांभाळता येत नाही महाराष्ट्र काय सांभाळाल – रामदास कदम
बुधवारी झालेला दसरा शिवसेनेच्या इतिहासात ऐतिहासिक ठरला. कधी नव्हे तो शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. बीकेसी मैदानात झालेल्या मेळाव्यात रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. सुरूवातीलाच घोषणा देताना त्यांनी आवाज शिवाजी पार्कवर गेला पाहिजे ,असं म्हणत आपल्य़ा भाषणाची सुरूवात केली.
शिवसेनेच्या ५२ वर्षांचा मी साक्षीदार आहे. पण आजचा जनसमुदाय पाहिला तर एकनाथ शिंदे यांचा निर्णय़ योग्य वाटतो. उध्दवजी आपले बंधु जयदेव ठाकरे शिंदे साहेबांना भेटले, बिंधुंमादव यांचे पुत्र एकनाथ शिंदेसांठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. आपले चुलत बंधू राज ठाकरे आपल्यासोबत नाहीत आपलं कुटूंब आपल्याला सांभाळता येत नाहीत महाराष्ट्र काय सांभाळाल असा सवालच त्यांनी उध्दव ठाकरेंना विचारला.
यानंतर त्यांनी उध्दव ठाकरेंनी आनंद दिघेंचा राजीनामा मागितला होता मी साक्षीदार आहे असा गौप्यस्फोट केला. उध्दवजी आपण अडीच वर्षात फक्त ३ वेळा मंत्रालयात गेलात तिथे अजित पवार रात्रंदिवस मंत्रालयात बसून सारा निधी राष्ट्रवादीला देत होते. योगेश कदम यांना किती त्रास दिला. जो यांच्यापेक्षा चांगलं बोलेल त्याला शांत बसवला. मला सांगितलं रामदासजी तुम्ही मिडीयासमोर जायचं नाही मी आदेशाप्रमाणे गेलो नाही. तुमच्या पिल्लाला आमदार करण्यासाठी वरळीतले दोन आमदारांना गप्प केलं.
याशिवाय त्यांनी सुशमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्यावर देखील टीका केली. कोण तो लांडगा भास्कर जाधव? तो काल राष्ट्रवादीतून आला त्याच्याकडून आम्ही शिवसेना शिकायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या शिवाय उध्दवजी खोक्यांची भाषा तुमच्य़ा आणि तुमच्या मुलाच्या तोंडी शोभत नाही असंही ते म्हणाले.