"स्थानिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे ठरले"

Update: 2022-07-20 08:23 GMT

शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले, त्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार याबाबत तिन्ही पक्षांच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी खासदारांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून तिन्बी पक्ष एकत्र लढतील अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली. संकट काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पूर्ण सहकार्य केले आहे, तसेच काही बंडखोरांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला वेळोवेळी मदत केली, असे खैरे यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही पक्षांनी शेवटपर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे, त्यामुळे आता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

शिवसैनिक मनापासून महाविकास आघाडीचे काम करतील आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न शिवसेना करेल असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Full View

Tags:    

Similar News