शिवसेना-राष्ट्रवादीचे जागावाटप ठरले?

Update: 2022-07-19 09:53 GMT

शिरुर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय झाला असल्याचे आपल्याला संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितले, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदारा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाने केलेल्या कारवाईबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली.

३ जुलै रोजी आपण उद्धव ठाकरे यांना भेटलो, त्यावेळी संजय राऊत यांनी मला शिरुरऐवजी पुण्यातून लढण्याचा सल्ला दिला, तसेच शिरुर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात २०१९मध्ये झालेला महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग हा २००९मध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. ००९मध्ये संजय राऊत यांनी आपल्याला फोन करुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार आहे, त्यामुळे आपण शिरुर मतदारसंघ शरद पवार यांच्यासाठी सोडावा, असा निरोप दिला होता, असा दावा आढळराव पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रस्तावाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माहिती नव्हती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच ३ जुलै रोजी पक्षाने आपल्यावर कारवाई केल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. पण त्या भेटीमध्येही संजय राऊत यांनी आपण शिरुरऐवजी पुण्यातून लढावे, तो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडून द्यावा, असे सांगितले. पण त्या प्रस्तावावर देखील आपण आक्षेप घेत सध्याच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना पुण्यातून का लढवत नाहीत, असा सवाल विचारला, पण त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, असा दावाही आढळराव-पाटील यांनी केला आहे.

Tags:    

Similar News