शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भेट घेतली. तसेच शिंदे गटाचा सदस्य पक्षाचा गटनेता करावा, अशी मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली.
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर दिल्लीतील शिवसेनेचं संसदेतील कार्यालय कोणाला मिळणार? असा सवाल केला जात आहे. दरम्यान संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी शिवसेना गटाने केली आहे.
या पत्रात शिंदे गटाने त्यांच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा अधिक बहुमत असल्याने हे कार्यालय शिंदे गटाला मिळावं अशी मागणी केली आहे. दरम्यान याच पत्रात शिंदे गटाने गटनेते पद बदलण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान या पत्रात काही त्रृटी राहिल्याने पुन्हा एकदा पत्राचा मजकूर बदलून हे, लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात येणार आहे.