बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांचा हल्ला
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले आहे. तर आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यालय फोडले आहे. यावेळी तुम्ही परत या. तुमच्या मनातील प्रश्न उध्दव ठाकरे नक्की सोडवतील आणि तुम्हाला माफ करतील असा आशावादही शिवसैनिकांनी व्यक्त केला. तसेच मंगेश कुडाळकर यांनी परत येण्याची विनंती केली.
जर तुम्ही परत आला नाहीत तर तुम्हाला कोण निवडून आणतंय ते आम्ही पाहूच असा दम शिवसैनिकांनी दिला.