तुमचे गिरीश महाजन बोटीत बसून सेल्फी काढत होते: मनिषा कायंदे कडाडल्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली पूरग्रस्त भागाच्या दौ-यावर आहेत. लोकांचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना तातडीने मदतीची गरज आहे. मात्र, संपुर्ण पूरग्रस्तांचा अहवाल आल्याशिवाय नेमकी किती मदत करायची? हे सांगता येणार नाही. अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.
यावर भाजपने आक्षेप घेतला असून नुसते दौरे काय करताय? ठोस मदत करा. अशी मागणी केली. यावर शिवसेना प्रवक्त्या Adv. मनिषा कायंदे तुमचे गिरिश महाजन बोटीत बसून सेल्फी घेत होते. असा पलटवार केला आहे. त्या मॅक्स महाराष्ट्रच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात बोलत होत्या.