शिवसेनेच्या 'या'आमदारांची आमदारकी धोक्यात
शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आयकर विभागाने जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई :mumbaiशिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आयकर विभागाने जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी जाधव यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका आयकर विभागाने ठेवला आहे. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वारीस पठाण यांचा पराभव केला. मात्र त्यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका आयकर विभागाने ठेवल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.