विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष सभागृहात दिसून आला. १६ आमदारंच्या अपात्रतेवरुन दोन्ही बाजूंनी अध्यक्षांना नोटीस देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ अधिवेशनात यावरुन नेमके काय घडले आणि पुढे काय घडू शकते, याची कल्पना आता दोन्ही बाजूंना आली आहे.