'एकदिवस नक्की समोर येईल की, कुणाचे सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकाला कुणाचे हॉटेल आहेत, असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भरसभेत उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खेडमधील भाषणात रामदास कदम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. रत्नागिरीमधील खेडच्या गोळीबार मैदानात शिवसेनेने जंगी सभा आयोजित केली. या सभेत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खेडमधील भाषणात रामदास कदम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'एकदिवस नक्की समोर येईल की, कुणाचे सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकाला कुणाचे हॉटेल आहेत, असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भरसभेत सर्वच उघड केलं.
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांना विनंती केली होती पण सहा महिने उद्धव ठाकरे भेटले नाहीत. रामदास कदम यांनी बाळासाहेबांचा उजवा हात म्हणून काम केले. शिवसेना रुजवली त्याच रामदास कदम यांच्या मुलांला वगणूक देते होते. एकनाथ शिंदेंनी एक दिवस निर्णय घेतला. आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि आम्हाला न्याय भेटला, असे आमदार योगेश कदम म्हणाले.
आमदार योगेश कदम यांना संपविण्यासाठी कसे प्रयत्न झाले, त्याचा साक्षीदार असल्याचे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेला उत्तर देण्यासाठी आज रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सभेचे आयोजन केले. त्यावेळी सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
सामंत म्हणाले, "योगेश कदमांना राजकीय कसे सपंवयाचे याचे षडयंत्र कसे रचायचे त्याबाबत झालेल्या बैठकीला मी होतो. मंडणगण आणि दापोली नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटे द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. योगेश कदम शिवसेनेचे आमदार मात्र राष्ट्रवादीला जास्त तिकीटे देण्याचा अलिखीत नियम केला, तसे आदेश झाले. त्यावेळी योगेश कदमांना मी सांगितले की तुम्ही आठ तिकटे घ्या. नंतर चार, दोन, त्यानंतर त्यांना काहीच द्यायचं नाही, असे ठरले. त्यानंतर राष्ट्रवादीला जास्त तिकीटे देऊन योगेश कदमांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी रुजविण्याचा प्रयत्न झाला. त्याचा मी साक्षदार आहे. आपल्याच आमदाराचे खच्चीकरण करण्याचा डाव रचण्यात आला. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली रामदास कदम यांनी मोडून काढला."
खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी संपवली आहे. गद्दारच जर म्हणायचे असेल, तर उद्धव ठाकरे यांना म्हटले पाहिजे. आज कोण आहे त्यांच्यासोबत? ज्यांनी आयुष्यात त्यांना घेरले, त्यांच्याकडून वेगवेगळे लाभ घेतले, त्यांना आता उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागत, असल्याचा हल्लाबोल कीर्तीकर यांनी केला.