Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया...

शिवसेनेच्या दोन गटातील केंद्रीय निवडणुक आयोगाच्या लढाईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहेत. हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.;

Update: 2023-02-17 14:37 GMT

गेल्या आठ महिन्यापूर्वी राज्यात सुरु असलेला दोन पक्षातील चिन्ह आणि पक्षाचे नाव या वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्री कोर्टात न्यायालयीन लढाई ठाकरे गटाला आज सकाळी पहिला धक्का बसला. सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरणाच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाने सध्या नकार दिला. आज दुपारी ही घडामोड घडली असताना संध्याकाळी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात दाद मागता येणार आहे. शिवसेनेची ओळख ही ठाकरेंची शिवसेना होती. ती आता ठाकरेंच्या हातून गेल्याचे पाहायला मिळत आहे. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागतच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आणि हा लोकशाहीचा विजय आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. आणि सत्याचा विजय झाल्याचे शिंदे म्हणाले आहेत. जो संघर्ष गेल्या आठ महिन्यापूर्वी सुरु केला होता. त्यावर एकप्रकारे केंद्रीय निवडणुक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येते असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले आणि पुन्हा एकदा शिंदे यांनी हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे सांगितले आहे. 

Tags:    

Similar News