'मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात, ते पाहावं लागेल'- राऊत

Update: 2021-09-17 05:55 GMT

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेलं. मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही, असं म्हणत, मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात, ते पाहावं लागेल, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला. शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना राऊत यांनी त्यांचं भरभरून कौतुकही केलं. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं. असं राऊत म्हणाले. मोदींनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही, असं राऊत म्हणाले.

दरम्यान संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर पंतप्रधान मोदी कोणता केक कापतील हे पाहावं लागेल.असं म्हणत देशातील नागरिकांच्या महागाईच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच असतील. पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असं वाटतं, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

दरम्यान अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाच्या पडलेल्या धाडी बद्दल बोलताना, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोनू सूद लोकांना मदत करत होते. त्यावेळी खूप वाद झाला. तेव्हा भाजप आम्हाला सांगत होता हा एकटा माणूस कसा काम करत आहे. दरम्यान सोनुने केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात भाग घेतला, म्हणून तो त्यांचा दुश्मन झाला. म्हणून त्याच्यावर कारवाई सुरू झाली अशी टीकाही राऊत यांनी केली.

Tags:    

Similar News