शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकाऱ्यांना फटकारले

शिवसेना आमदार भास्कर जाधव आज ॲक्शन मोडमध्ये दिसले. आ. भास्कर जाधव स्वत: चिपळूणच्या रस्त्यावर असतांना अधिकारी आले नसल्याने , त्यांनी चिपळूणच्या प्रांत चांगलेच अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Update: 2021-07-26 10:37 GMT

शिवसेना आमदार भास्कर जाधव स्वत: चिपळूणच्या रस्त्यावर असतांना अधिकारी आले नसल्याने त्यांनी चिपळूणच्या प्रांत चांगलेच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमदार जाधव यांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांना फोन करून धारेवर धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी स्वतः रस्त्यावर असताना अधिकारी गेले कुठे? असा सवाल त्यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकाऱ्यांना केला. दरम्यान नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपण पाण्याची एक बाटली पुरवू शकत नाही का? असं म्हणत आमदार जाधव यांनी प्रांत अधिकारी यांना फटाकरले.

भास्कर जाधव ॲक्शन मोडमध्ये

मुख्यमंत्र्यांसमोरच एका पूर बाधित महिलेला दमदाटी केल्याचा आरोप झाल्यानंतर आ. भास्कर जाधव आज ॲक्शन मोडमध्ये दिसले. दरम्यान "मागील सहा दिवसांपासून आपण चिपळूणची बाजार पेठ स्वच्छ करू शकलो नाही आपलं प्रशासन एवढं ढेपाळलं आहे" असं म्हणत मी ठरवलं तर माझ्या हजार- दीड हजार कार्यकर्त्यांना घेऊन अवघ्या तीन चार तासात संपुर्ण बाजारपेठ स्वच्छ करू शकतो असं जाधव यांनी प्रांत अधिकाऱ्यांना सुनावले. आ. भास्कर जाधव हे आपल्या कार्यकर्त्यांसह चिपळूण शहरात साफसफाई करताना दिसले.

आमदार जाधव यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले

दरम्यान भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावत आपण वडीलकीच्या नात्याने त्या महिलेला सल्ला देत होतो असं म्हटलं आहे. भोजने आणि आमचे कौटुंबिक संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विरोधकांनी नको त्या गोष्टीवरून राजकारण करू नये त्यांच्या आरोपांवर मला उत्तर देण्याची गरज नाही , मी कामातूनच त्यांना उत्तर देईल असं जाधव यांनी म्हटलं आहे. सोबतच बदनामीला घाबरू नकोस आपल्या मधला शिवसैनिक मरु देऊ नकोस असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्याला सांगितले असल्याचे जाधव यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News