'नारायण राणेच काय असे चाळीस केंद्रीय मंत्री आले तरी शिवसेनेवर परिणाम होणार नाही'

नारायण राणेच काय असे चाळीस केंद्रीय मंत्री आले तरी शिवसेनेवर परिणाम होणार नाही'.असं म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. ते मॅक्स महाराष्ट्रच्या टू द पाँईट या कार्यक्रमात बोलत होते;

Update: 2021-08-06 08:51 GMT

 नारायण राणेच काय असे चाळीस केंद्रीय मंत्री आले तरी शिवसेनेवर कुठलाच परिणाम होणार नाही असं शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात ते बोलत होते.

पाऊस पडत असताना मुख्यमंत्री काय करत होते? विरोधक आधी कसे पोहोचले? आदित्य ठाकरे यांना लोकांचा रोष का पत्करावा लागला? भास्कर जाधव का रागावले ? भास्कर जाधव यांनी महिलेला का दम दिला? आणि पूरग्रस्तांची तोकडी मदत या विषयांवर उदय सामंत यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रच्या थेट प्रश्नांना उत्तर दिले.

चिपी विमानतळ हे आमच्यामुळे आले असल्याचे नारायण राणे जरी सांगत असले, तरी प्रत्येक्षात काम मात्र विनायक राऊत यांनी केलेलं आहे असा दावाही उदय सामंत यांनी केला. नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दम दिला मला नाही असं सांगून त्यांनी राणे यांना अप्रत्यक्षपणे आव्हानच दिले. पाऊस जेव्हा पडला तेव्हा मुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत संपर्कात होते आणि ते प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून होते. मी स्वतः पुरात अडकलो होतो, एकनाथ शिंदे , विनायक राऊत, आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी जे केलं ते लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तरी लोकांमध्ये मात्र शिवसेनेविषयी विश्वास असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही तात्पुर्ती आहे, हे आम्ही मान्य करतो पण कोकणासाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आणि ते पूर्णत्वास येईल असा आम्हाला विश्वास आहे असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना पीक विम्यातून अधिक रक्कम मिळावी आणि ती वेळेवर मिळावी यासाठीही सरकार येत्या दहा दिवसात बैठक घेणार असून त्यावर मार्ग काढला जाईल असे सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. विरोधक खोटे बोलत आहेत, विरोधकांना खोटं बोलल्या शिवाय काही येत नाही असा टोलाही उदय सामंत यांनी नारायण राणे यांना लगावला.

उदय सामंत यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही मॅक्स महाराष्ट्रचे फेसबुक पेज आणि युट्युब चॅनेलवर पाहु शकता.

Full View

Tags:    

Similar News