शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यासमोर बोलून दाखवली 'ही' सल

Update: 2021-10-10 05:35 GMT

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नवी दिल्लीत भेट झाली. या भेटीचा आजच्या सामनाच्या रोकठोकमधून तपशील लिहिला आहे. दरम्यान राहुल गांधींसोबतच्या चर्चेत राष्ट्रीय राजकारणासंबंधी एक मोठी खंत बोलून दाखविल्याचं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करुन देत आहेत, असं राऊत यांनी राहुल गांधी यांना म्हटलं आहे.

गोव्यात काही संबंध नसताना तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. त्यासाठी सगळेच पैशांचा वापर करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाला तृणमूल व आम आदमी पक्ष गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे ठरत आहे, असंही रोखठोकमध्ये म्हटले आहे.

दरम्यान सामनाच्या रोखठोकमधून ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण त्या संपूर्ण देशात स्वीकारार्ह नाही असं म्हटलं आहे तर केजरीवाल हे केंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे आहे असं म्हणत, देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्या स्वतः मध्ये नाही. मात्र त्यांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधीही नको आहेत. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे असंही रोकठोक मधून राऊतांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News