Shivsena Vs Shivsena : शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच, निहार ठाकरे मोठं वक्तव्य
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद झाल्यानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे वक्तव्य ठाकरे घराण्यातून करण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या वतीने कपील सिब्बल (Adv. Kapil Sibbal) आणि देवदत्त कामत (Adv. Devdatta kamat) यांनी यांनी जोरदार युक्तीवाद केला. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या वतीने महेश जेठमलानी (Adv. Mahesh Jethmalani) आणि मनिंदर सिंग (Adv. Manindar Singh) यांनी युक्तीवाद केला. तीन तासांपेक्षा जास्त वेळ सुरु असलेल्या या युक्तीवादानंतर निडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षचिन्हाबाबत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. तर ही सुनावणी 30 जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीनंतर बोलताना ठाकरे घराण्यातील Adv.निहार ठाकरे (Mihir Thackeray) यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत पक्षाची प्रतिनिधी सभा हिच सर्वोच्च असते. तसेच पक्षाच्या घटनेनुसार (Party Constitution) प्रतिनिधी सभा तयार नेमली जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधी (MLA And MP) नाही तर प्रतिनिधी सभा महत्वाची असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वतीने सिब्बल आणि कामत यांनी केला. मात्र प्रतिनिधी सभेतील सदस्यच नाही तर लोकप्रतिनिधी देखील महत्वाचे असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत आहे. त्यानुसार शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांचाच असल्याची प्रतिक्रीया उध्दव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी दिली.