EVM हॅक प्रकरणी भाजप आमदारासह इतरांवर गुन्हे दाखल करा; शिवसेनेची मागणी

EVM हॅक प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

Update: 2021-08-21 06:34 GMT

कल्याण : ईव्हीएम मशीन हॅक करत कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजयी केल्याचा दावा करणरी आशिष चौधरी नावाचा व्यक्तीची व्हिडीओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत असून, याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांना निवेदन दिले.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आशिष चौधरी याने भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सांगण्यावरून असे केले असल्याचे म्हणत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतरांवर ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

मात्र, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आशिष चौधरीवर आपल्या मुलाला सॉफ्टवेअर देतो म्हणून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याने आशिष हा कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये आहे. यामुळे सॉफ्टवेअर हॅकिंगचा दावा करणाऱ्या आशिषची चौकशी पोलीस करू शकत नाही. आशिषची पुन्हा चौकशी केल्यानंतरच या ईव्हीएम मशीन हॅकिंग प्रकरणी सत्य समोर येणार असल्याच पोलिसांचं म्हणणं आहे.

Tags:    

Similar News