एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या शुभेच्छा .

अखेर या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील म्हणून घोषणा केली आहे.

Update: 2022-06-30 13:24 GMT



२०१९ च्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं .राष्ट्रवादी ,शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची युती होऊन ठाकरे सरकारने सत्ता स्थापन केली होती.पण बुधवारी रात्री सरकार अल्प मतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे हे सत्तानाट्य घडून आलं आहे .

अखेर या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील म्हणून घोषणा केली आहे.संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्री पद घेतलं नाही ,त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याचा मान दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यांनतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी ट्विटद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .

'श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो',असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे .महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दिवसरात्र एक करू अशी ग्वाही एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषदेत दिली आहे .एक मजबूत सरकार आम्ही देऊ अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली आहे . 

Tags:    

Similar News