किंमत मोजावी लागेल, अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांचा इशारा
अजित पवार यांच्या बंडानंतर दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजपला थेट इशाराच दिला.;
अजित पवार (Ajit pawar rebel) यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढणार? यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच शरद पवार यांनी यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावरून शरद पवार यांनी थेट इशारा दिला आहे. (NCP president Sharad pawar organize meeting at his residence of Delhi)
या बैठकीनंतर शरद पवार यांनी ट्वीट (Sharad pawar Tweet) केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर होईल. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना लोक दूर करतील. तसेच विरोधी पक्षात काम करणाऱ्यांविरोधात ज्या पद्धतीने पावलं उचलली जात आहेत. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. लोकांचे मत घेतल्यानंतर जे चुकीच्या मार्गाने गेले आहेत. त्याची किंमत मोजावी लागणार असल्याचा थेट इशारा शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजपला दिला आहे. (Sharad pawar warning to ajit pawar and BJP)
याबरोबरच महाराष्ट्रातील स्थिती बदलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संघटनेची सत्ता येईल, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.
नेमकं काय घडलं दिल्लीत?
दिल्लीतील निवासस्थानी आज (दि. 6 जुलै) रोजी कार्यकारिणीच्या सदस्यांची बैठक झाली. यामध्ये ज्यांना निलंबित करण्यात आले आहे. ते वगळता इतर सर्वजण उपस्थित होते. मात्र पक्षाला काही लोकांनी ठेच पोहचवली आहे. परंतू पक्ष पुन्हा ताकदीने उभा करण्याबरोबरच पक्षाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणण्याची मानसिकता सगळ्यांची आहे. त्यामुळे मला आनंद होत आहे की, ही बैठक आमचा उत्साह वाढवण्यासाठी महत्वाची ठरली.
अजित पवार यांनी शरद पवार यांना हटवून आपण पक्षाचा राष्ट्रीय नेता असल्याचे जाहीर केले होते. त्याचा शरद पवार यांनी साफ शब्दात इन्कार केला. एवढंच नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. कुणी यासंदर्भात दावे करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र या दाव्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही, असंही शरद पवार यांनी सांगितले.
आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला जी भूमिका मांडायची आहे. ती आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडू, असं म्हणत शरद पवार यांनी आपण निवडणूक आयोगासमोर जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच या कायदेशीर प्रक्रीयेकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही इतर यंत्रणांकडेही जाऊ, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र अशा प्रकारे इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नसल्याचे शरद पवार यंनी सांगितले.
मुझे खुशी है की आज नई दिल्ली में निवासस्थान पर हुई कार्यसमिति सदस्यों की बैठक में जिन लोगों को निलंबित किया गया है उन्हें छोडकर बाकी लोग उपस्थित थे। पार्टी को ठेस पहुंचाने का काम कुछ लोगों ने किया। पार्टी को फिर मजबुतीसे खड़ा करना,आगे लेके जाना,अच्छी स्थिती में लाने की मानसिकता…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 6, 2023