Ajit Pawar News : अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय... शरद पवारांनी थेटच सांगितलं...

Update: 2023-02-11 07:45 GMT

अहमदनगर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना साधारणत: दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात आतापासूनच मुख्यमंत्री कोण होईल, कुणाची सत्ता येईल, याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. त्यात भरीस भर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी एका जाहीर सभेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करायचे असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या खास स्टाईलने उत्तर दिले आहे.

आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या खास मर्जीतले समजले जातात. शिवाय अजित पवार यांच्याही लंके हे तितकेच जवळचे समजले जातात. त्यामुळे पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादीने आमदार लंके यांना खास स्टार प्रचारक म्हणून प्रचारात उतरवलं आहे. या प्रचारातील एका सभेत आमदार लंके यांनी अजित पवारांबद्दल ते वक्तव्य केले होते. त्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले," कुणाला काहीही आवडू शकतं, मात्र तुमचं तेवढं संख्याबळ असलं पाहिजे ना ? जर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असता तर सर्व सहका-यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतले असते. आजमितीस आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्रीपदावर भाष्य करणं मला योग्य वाटत नसल्याचं सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या विषयावर पडदा टाकला.

आमदार लंके यांच्या या विधानासंबंधी विचारले असता शरद पवार म्हणाले की, ‘कोणाला काहीही आवडू शकते. मात्र, तुमचे तेवढे संख्याबळ असले पाहिजे ना? जर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात क्रमांक एकचा पक्ष असता तर सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतले असते. मात्र, आज आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे सध्या तरी यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही’, असं सांगत पवार यांनी हा विषय संपवला.

Tags:    

Similar News