चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा काढल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी पैठण येथे बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao patil), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr.Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुले (mahatma phule) यांनी भीक मागून शाळा काढल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत होता. त्यातच शनिवारी पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी प्रतिक्रीया दिली.
शरद पवार हे त्यांच्या अभिष्टचिंतानाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, महात्मा फुले आणि आंबेडकरांनी आयुष्यभर ज्ञानदानाच काम केलं. महात्मा फुलेंनी दागिने विकून गरीब मुलांना शिक्षणाची दार उघडून दिली. यावर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भीक या शब्दाचा प्रयोग केला तो करायला नको होता, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. काहींच्या भावना दुखावल्याने शाई फेकली गेली. त्या शाईफेकीचे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन करणार नाही. कारण ही घटना सांस्कृतिक महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.