Big Breaking : अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या वृत्तावर शरद पवार यांची प्रतिक्रीया

Sharad pawar News : अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपशी घरोबा करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आता शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

Update: 2023-04-18 10:44 GMT

Sharad pawar on Ajit pawar : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी (NCP) पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यानतंर मंगळवारी अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलवल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. त्यामुळे राज्यात सत्तानाट्य 2 सुरु असल्याचे म्हटले जात होते. त्यावर अखेर शरद पवार (Sharad pawar Comment on Ajit pawar) यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

अजित पवार यांनी आपला दौरा रद्द केल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. त्यातच अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलवली असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यावर शरद पवार यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, जी चर्चा तुमच्या मनात सुरु आहे. ती आमच्या कुणाच्याच मनात नाही. त्या चर्चेला अजिबात महत्व नाही. राष्ट्रवादी पक्षाबद्दल मी एवढंच सांगू शकतो की, राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सहकारी एका विचाराने पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. याशिवाय कुठलाही विचार आमच्या मनात नाही, असं शरद पवार यांनी सांगितले. (Sharad pawar denied Ajit pawar join BJP News)

अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलवल्याचे वृत्त 100 टक्के खोटं आहे. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने सांगिल्यानंतर तुम्हाला या गोष्टीला फाटे फोडण्याचा अधिकार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Full View

Similar News