IB माझा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देते, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Update: 2021-07-11 06:52 GMT

माझे फोन टॅप केले जातात याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना आयबीकडून दिला जातो. असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मला ही व्यवस्था सुखाने जगू देणार नाही. माझे फोन टॅप केले जातात. मी कोठे जातोय. काय बोलतोय? याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आयबीकडून दिला जातो. असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते लोणावळा येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी बोलत होते.

सध्या महाराष्ट्रात सर्वच पक्ष एकला चलो रे चा नारा देत आहेत. सुरुवातीला एकला चलो रे चा नारा देणारे नाना पटोले पक्ष श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर शांत होते. मात्र, पुन्हा एकदा नाना पटोले यांनी 'एकला चलो रे; चा नारा दिला आहे. मात्र, यावेळी हा नारा देताना त्यांनी मित्र पक्षांवरच आपली तोफ डागली आहे.

"मी स्वबळाचा नारा दिला, तर सर्वांच्या पोटात गोळा आला. आता मुख्यमंत्री शिवसेना म्हणून कामाला लागा हे सांगतात, तेव्हा सर्वांना गोड वाटतंय, महाराष्ट्र कॉंग्रेसमय करण्याचा माझा मानस आहे; पण माझे फोन टॅप केले जातात याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना आयबीकडून दिला जातो. असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मला ही व्यवस्था सुखाने जगू देणार नाही. माझे फोन टॅप केले जातात. मी कोठे जातोय. काय बोलतोय? याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आयबीकडून दिला जातो. अस म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना उत्तर द्या...

कॉंग्रेस मोठी होते, ते त्यांना खपत नाही. त्याकरिता सोबत राहून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना ताकदीने उत्तर द्यायचे आहे. त्रासाला ताकद बनवा, आत्मविश्वासाने पुढे जाउन संघटना बांधणीवर भर द्या २०२४ ला काँग्रेस महाराष्ट्रात येणार, असा विश्वास कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags:    

Similar News