मोहन भागवत पश्चिम बंगालमध्ये, पोलिसांनी राज्यात दंगल होणार नाही याची काळजी घ्यावीःममता बॅनर्जी

मोहन भागवत पश्चिम बंगालमध्ये, पोलिसांनी राज्यात दंगल होणार नाही याची काळजी घ्यावी, ममता बॅनर्जी यांचा मोहन भागवत यांच्यावर निशाणा

Update: 2022-05-18 10:22 GMT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलिसांनी मोहन भागवत यांना मिठाई आणि फळं खायला द्यावीत आणि राज्यात दंगल होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा शब्दात मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंगळवारपासून सुरू झालेल्या संघाच्या प्रशिक्षण शिबिरात भागवत उपस्थित राहणार आहेत. केशियरीमध्ये हे शिबीर तीन आठवडे चालणार आहे. या विषयी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, केशियारीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांच्या वास्तव्याचा उद्देश काय? ... मी पोलिसांना सांगेन की प्रशासनाच्या वतीने त्यांना मिठाई आणि फळे पाठवू शकतात. आम्ही आमच्या पाहुण्यांशी किती सौहार्दपूर्ण आहोत. याची त्यांना जाणीव होऊ द्या.

ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मधील अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होत्या. येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केशियारी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी 'योग्य सुरक्षा द्या आणि दंगल होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिव्याचं समजतंय.

Tags:    

Similar News