भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा जामीन अर्ज फेटाळला; ईडी अटक करणार का ?
भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा अटक पूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. भोसरी MIDC जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी मंदाकिनी खडसेंना ED ने समन्स बजावले होते त्याविरोधात एकनाथ खडसें च्या पत्नी मंदाकिनी खडसें अटकपूर्व जामीन मिळववण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता आज कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुणे येथील भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. दुसरे संशयित मंदाकिनी खडसें यांचा अर्ज फेटाळल्याने ईडी आता अटकेची कारवाही करनार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान मंदाकिनी खडसें ह्या सत्र न्यायालयाच्या निकाला विरोधात हायकोर्टात जाणार आहेत. हायकोर्ट कोणता निकाल देतो त्यानंतरच मंदाकिनी खडसेंना अटक की जामीन हे समजणार आहे.
काय आहे नेमकं भोसरी MIDC भूखंड प्रकरण -
भाजप शिवसेना युतीचे सरकार मधील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना एकनाथ खडसे यांच्या कडे 12 खाती होती त्यात महसूल खात ही होत , याच दरम्यान पुणे भोसरी MIDC मधील भूखंड खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसें आणि जावई गिरीश चौधरी यांनी कोलकाता येथील व्यक्ती कडून खरेदी करतांना नियम बाह्य खरेदी केला. ह्यात साडे तीन कोटींचा झालेला आर्थिक व्यवहारही संशयास्पद असल्याची तसच एकनाथ खडसेंनी आपल्या पदावर गैरवापर करून सरकारी यंत्रणेचा वापर करून हा व्यवहाराला मदत केली. याबाबत पुणे येथील व्यवसायिक हेमंत गावंडे यांनी तक्रार केली , त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ह्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण चांगलंच गाजल्याने खडसेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला . तसेच ह्या प्रकरणाची चौकशी साठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या अध्यक्ष तेखाली कमिटी नेमली होती.
झोटिंग समितीनेही खडसेंवर तशोरे ओढले आहेत. आता हेच प्रकरण खडसेंच्या मानगुटीवर आहे.
ईडीने अगोदरच एकनाथ खडसे त्यांची तसेच पत्नी मंदाताई एकनाथ खडसें , जावई गिरीश चौधरी , यांची चौकशी केली आहे. ह्या चौकशीत भोसरी MIDC जमिनीच्या व्यवहारातील पैसे कोठून आले ह्याबाबत तिघांचे जबाब वेगवेगळे आल्यान ईडीला संशय असल्याने अधिक चौकशी साठी खडसेंची कोठडी मिळवण्याचा ईडीचा प्रयत्न आहे.
भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे हेच ह्या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याच ईडीने दोषरोप ठेवले आहेत.खडसें नंतर पत्नी मंदाकिनी खडसें, जावई गिरीश चौधरी ह्यांच्यावरही दोषरोप पत्र ईडीने दाखल केले आहे.