मोदींच्या फोटोला काळं फासणाऱ्या तांबेंना पाठींबा, भाजपसाठी ठरणार नामुष्की

Update: 2023-01-17 09:08 GMT

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक ऐन रंगात आली आहे. त्यातच सत्यजित तांबे यांना भाजप पाठींबा देणार असल्याची चर्चा आहे. मात्र सत्यजित तांबेंना पाठींबा देणे भाजपसाठी मोठी नामुष्की ठरू शकते.

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूकीत भाजपने अधिकृत उमेदवार दिला नाही. त्यामुळे भाजप सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनाच पाठींबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तांबेंच्या बंडामागे भाजपचा (BJP) हात असल्याची आरोप नाना पटोले यांनी केला होता. त्यातच भाजप समर्थित धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) आणि धनराज विसपुते (dhanraj Vispute) यांनी सत्यजित तांबे यांच्याविरोधातील अर्ज मागे घेतल्याने भाजप तांबे यांनाच पाठींबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले की, नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूकीत सत्यजित तांबे यांना पाठींबा देण्याबाबत पक्ष काय तो निर्णय घेईल. मात्र सत्यजित तांबे यांनी पाठींबा मागितला आणि पक्षाने पाठींबा दिला तर सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असं गिरीश महाजन म्हणाले.

मात्र सध्या सोशल मीडियावर सत्यजित तांबे हे मोदी यांच्या फोटोला काळे फासत असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे भाजपने सत्यजित तांबे यांना पाठींबा दिल्यास भाजपची मोठी कोंडी होणार आहे.


Tags:    

Similar News