नाना पटोले यांच्या आरोपांना सत्यजित तांबे यांचे उत्तर

नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही दोन कोरे एबी फॉर्म देऊनही तांबे यांनी पक्षाशी धोकेबाजी केली, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. त्याला सत्यजित तांबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;

Update: 2023-01-29 02:54 GMT

नाशिक पदवीधर (Nashik Biennial election) निवडणूकीत सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ही अर्ज डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांच्या नावाने पाठवला असताना त्यांनी पक्षाशी धोकेबाजी केली आणि सत्यजित तांबे यांचा अर्ज भरल्याचे नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर आम्ही दोन कोरे एबी फॉर्म पाठवूनही सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ही पक्षाशी धोकेबाजी असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्यावर सत्यजित तांबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सत्यजित तांबे म्हणाले, मी काँग्रेसचा (Congress) निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी 22 वर्षांपासून काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करीत आहे. एवढंच नाही आमचा परिवार काँग्रेसमध्ये काम करत आहे. या गोष्टीला 2030 मध्ये 100 वर्षे पूर्ण होतील. मी पदवीधरसाठी उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यानेच मला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. एवढंच नाही तर नाना पटोले (Nana patole) जे आरोप करीत आहेत. ते आरोप अर्धसत्य आहेत. त्यामुळे नाना पटोले यांच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देईन आणि जेव्हा उत्तर देईन तेव्हा तुम्ही सगळे चकीत व्हाल, असे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.


Tags:    

Similar News