संजय राऊत यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले आहे : बच्चू कडू

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मध्ये जर हिम्मत असेल आणि त्यांच्यात अजूनही शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणाऱ्या राजकीय पक्षाच्या एजंट ला ओळखून दाखवावे. अन्यथा संजय राऊत यांना शिवसैनिक म्हणण्याची लायकी नाही असा टोला देत आमदार बच्चू कडू यांनी फटकारलं आणि हे विधान बच्चू कडू यांनी नागपुरात प्रहार आंदोलनाच्या निमित्ताने पत्रकारांशी सव्वाद साधताना केले.;

Update: 2023-03-21 09:53 GMT

राजकीय पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपने अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांचा दलाल म्हणून वापर केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, संजय राऊत यांनी किमान एका तरी एजंट चा उल्लेख करावा. त्यांचे दावे निराधार आहेत.

बच्चू कडू यांच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यावर अनेक प्रश्न ही निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण अभ्यास करून न्यायालयात स्वतःची बाजू मांडली. त्यामुळे राऊत यांनी प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावे असेही बच्चू कडू म्हणाले.

Tags:    

Similar News