संजय राऊत यांच्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी

गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ED ने संजय राऊत यांना अटक केली आहे. मात्र संजय राऊत यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.;

Update: 2022-08-06 05:32 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना गोरेगाव पत्राचाळ (Goregaon patra chawl) प्रकरणी ED ने 31 जुलै रोजी अटक केली आहे. तर 8 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम ED च्या कोठडीत असणार आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यातून गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करीत ED ने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे. तर वर्षा राऊत ED कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

संजय राऊत यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवल्याने ईडीने संजय राऊत यांच्याभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोरेगाव पत्राचाळ जमीन प्रकरणातील व्यवहार वर्षा राऊत यांच्या खात्यातून झाल्याचा संशय व्यक्त करीत ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे. तर वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.

एप्रिलमध्ये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्याशी संबंधीत दोन सहकाऱ्यांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता तात्परत्या स्वरूपात जप्त केली होती. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची 9 तर वर्षा राऊत यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यानंतर संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. तर संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. त्याप्रकरणी वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News