ज्यांची जशी लायकी, तशी माझी भाषा, निवडणूक आयोगाला वापरलेल्या अपशब्दाबद्दल संजय राऊत यांनी घेतली भूमिका

संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल वापरलेल्या अपशब्दाबद्दल मी माफी मागणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.;

Update: 2023-03-04 05:25 GMT

Sanjay Raut : संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला भोxxx असा अपशब्द वापरला होता. त्याचे पडसाद राज्याच्या विधीमंडळातही उमटले. मात्र दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबद्दल वापरलेल्या अपशब्दावरून माफी मागण्यास नकार दिला. (Sanjay raut use abbusive word for ECI) संजय राऊत म्हणाले, मी शिवी दिल्याने गदारोळ केला. पण ज्यांची जशी लायकी तशी भाषा मी वापरली. त्याबद्दल मी माफी मागणार नाही. 50 खोके एकदम ओके ही देशातील लोकप्रिय शिवी झाली आहे. बाळासाहेब देसाई (Balasaheb Thorat) यांनी शिवसेना (Shivsena) वाढवण्यासाठी योगदान दिले. मात्र त्यांचे पाप्याचे पितर शंभू की चंभू हे शिवसेनेतून फुटून गेले. मात्र शिवसेना ही एक बस आहे. यामध्ये पुढच्या दरवाजाने 50 उतरले तर मागच्या दरवाजाने 100 शिवसेनेच्या बसमध्ये बसतात. त्यामुळे शिवसेना संपवण्यासाठी आणि मुंबईचे लचके तोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न फेल होतील. एके काळी यशवंतराव चव्हाण (Yashawantrao Chavan) , वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांनी शिवसेनेची गरज ओळखली होती. त्यामुळे त्यांनीच शिवसेना वाढवण्यासाठी मदत केल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केला.

Tags:    

Similar News