उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांचे ट्वीटची चांगलीच चर्चा आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्या नंतर मुख्यमंत्री अत्यंत ग्रासफुल्लय पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ!
नेमके हेच घडले! pic.twitter.com/nNkBXNAzB3
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 30, 2022
असं ट्वीट केलं होतं. मात्र, त्यानंतर आज सकाळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर वार केलेला एक फोटो ट्टीट केला आहे.
हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून शिंदे गटावर या ट्वीट च्या माध्यमातून निशाणा साधला आहे.