गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? संजय राऊत यांनी ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांना विचारला सवाल

गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? असा सवाल करत संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.;

Update: 2023-03-18 10:28 GMT

महिला दिन (Womens Day) होऊन काही दिवसही लोटले नाहीत तोच राज्यात दररोज महिलांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच बार्शी (Barshi Solapur) येथे पारधी समाजाच्या मुलीवर हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करून समोर आणला आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. (Sanjay Raut Tweet)

संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटूंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप (BJP) पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला त्या मुलीवर केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? असा सवाल करत ५ मार्चला हल्ला झाला. मात्र अजूनही आरोपी मोकाट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केल्याने मोठी खळबळ उडाली असून यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Tags:    

Similar News