पंतप्रधान मोदी यांची डिग्री क्रांतीकारी आणि ऐतिहासिक, संजय राऊत यांचं ट्वीट

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा फोटो ट्वीट करून खोचक टोला लगावला आहे.;

Update: 2023-04-03 04:24 GMT

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच पंतप्रधान मोदी यांची डिग्री मागितल्याने केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय राऊत यांच्या डिग्रीचा फोटो ट्वीट केला आहे. (PM Modi Degree controversy)

संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, लोक म्हणतात आमचे पंतप्रधान मोदी यांची डिग्री बोगस आहे. पण मला विश्वास आहे की, 'Entire political Science' विषयावरची ही ऐतिहासिक आणि क्रांतीकारी पदवी आहे. ही पदवी नव्या संसद भवनच्या (Central Vista) मुख्य प्रवेशद्वारावर फ्रेम करून लावायला हवी. त्याचं कारण लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले नाहीत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News