बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा सल्ला

एकनाथ शिंदे गटाने बंड केल्याने शिवसैनिक आक्रमक झाला आहे तर उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मोलाचा सल्ला दिला आहे. तो काय आहे जाणून घेण्यासाठी वाचा..;

Update: 2022-06-25 03:55 GMT

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र तरीही शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेने बंडखोर आमदारांना अल्टीमेटम दिला होता. मात्र या अल्टीमेटमनंतरही बंडखोर आमदार पुन्हा मुंबईत परत आले नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक ट्वीट करत बंडखोर आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय राऊत यांनी रुदयार्ड किपलिंग यांचे कोट ट्वीट केले आहे. यामध्ये पैशाच्या, पदाच्या किंवा वैभवाच्या चिंतेपासून सावध रहा. कोणीतरी तुम्हाला अशा माणसाला भेटवेल की ज्याला या कोणत्याही गोष्टीची काळजी नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती गरीब आहात, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना सांगितले होते की, मला पदाचा मोह नाही. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. पण वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जात आहे. याचा संदर्भाने संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा मोह नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर याआडून गुहावटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला असल्याचेही म्हटले जात आहे.

Tags:    

Similar News