२६ जुलैला उद्धव ठाकरे फुटीर गटाची विनंती मान्य करणार?

पक्षातील मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीबाबत संजय राऊत यांनी सूचक ट्विट केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Update: 2022-07-23 12:24 GMT

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर सगळ्यात पहिली मुलाखत दिली आहे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना... शिवसेनेतील बंड, बंडखोऱांशी तडजोडीची तयारी, पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी पुढील रणनीती काय, धनुष्य बाण कुणाचा यासह अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका सविस्तरपणे या मुलाखतीमध्ये मांडली आहे.

संजय राऊत यांनी दोन केले आहेत, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, २६ जुलैला उद्धव ठाकरे फुटीर गटाची विनंती मान्य करणार? अशी घोषणा त्यांनी केली आहे.

तसेच संजय राऊत यांनी पुन्हा एक सूचक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे,

"मी: साहेब,फुटीर गटाची तुम्हाला एक विनंती आहे.

उद्धवजी: बोला..मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो..

खळबळ जनक मुलाखत. सामना: 26 आणि 27 जुलै" असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजला टॅग केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना यामधून काय संदेश द्यायचा आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे युतीसाठी तयार आहेत, पण पहिला फोन कुणी करायचा या इगोमुळे चर्चा रखडली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी दिली होती. आता संजय राऊत यांनी या उद्धव ठाकरे शिंदे गटाची विनंती मान्य करत असल्याचे ट्विट केल्याने त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Tags:    

Similar News