संजय राऊतांनी केला श्रीकांत शिंदेवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप...

राज्याच्या राजकारणात दररोज अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये राऊत यांनी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जीव मारण्याची सुपारी दिली असल्याचे नमूद केले आहे.;

Update: 2023-02-21 14:24 GMT

ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याला जीव मारण्याची सुपारी एका ठाण्यातील गुंडाला देण्यात आल्याचे राऊत यांनी एका पत्राद्वारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कळवले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांनी याबाबतचे पत्र ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या पत्रात राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर थेट आरोप केला आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. याबाबतची माहिती त्यांनी गृहमंत्र्यांना दिली होती. ठाण्यातील गुंड असलेल्या राजा ठाकूर याला संजय राऊत यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरुन करण्यात येणार असल्याचा आरोप राऊत यांनी लावला आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचा (Shiv Sena) नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ठाण्यातील गुंड राजा ठाकूर यांचे नाव राऊत यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. या राजा ठाकूरलाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिली असल्याचा आपल्याला संशय असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. मात्र ही सर्व स्टंटबाजी असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत हे सहानभूती आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

Tags:    

Similar News